By  
on  

कमी पैशात सहकुटुंब नाटक पाहता यावं अभिनेता प्रशांत दामले यांनी घेतला हा स्तुत्य निर्णय

लॉकडाऊननंतर नाट्यरसिक पुन्हा एकदा थिएटरकडे वळला आहे. पण तिकिटाचे दर मात्र अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. अशा वेळी एका पेक्षा जास्त व्यक्तींनी किंवा सहकुटुंब नाटक पाहण्यासाठी अनेकदा आर्थिक मर्यादा येतात.  अडचण लक्षात घेत अभिनेते प्रशांत दामले यांनी एक हटके उपक्रम सुरु केला आहे. त्यांनी प्रायोगिक तत्वावर आपल्या नाटकांचे तिकीट दर १०० रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रशांत यांनी ही घोषणा केली आहे.  “अनेक नाट्यरसिकांनी मला संपर्क करून सांगितले की आम्हाला सहकुटुंब नाटक बघण्याची इच्छा आहे परंतु तिकीट दर जरा जास्त असल्यामुळे आम्ही पाहू शकत नाही. म्हणूनच मी असा निर्णय घेतला आहे की बाल्कनीचा तिकीट दर जो आधी ३०० रुपये आणि आणि २०० रुपये होता, तो आता फक्त १०० रुपये ठेवण्यात येणार आहे,” हे दर सध्या प्रायोगिक तत्वावर ठेवण्यात आल्याचं प्रशांत यांनी सांगितलं आहे. अनेक नाट्यरसिकांनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive