By  
on  

अभिनेत्री पुजा सावंतचा हॉररपट ‘बळी’ सिनेमातील लूक आला समोर

अलीकडेच स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या ‘बळी’ सिनेमाचा टीजर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीजरमध्ये एका हॉस्पिटलचा सीन समोर येतो. यामधे या पार्श्वभूमीवरच सगळ्या घटना घडताना दिसतात. या टीजरमध्ये  ‘एलिझाबेथ’ अशी हाकही कानावर पडताना दिसते. 

 

 

या सिनेमात पुजा सावंतही दिसते आहे. या सिनेमातील तिचा लूक समोर आला आहे. यामध्ये मागे वळलेली पुजा दिसते आहे. याशिवाय तिच्या हातात स्थेथोस्कोप ही दिसतो आहे. यावरुन पुजा या सिनेमात डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार हे स्पष्ट झालं आहे. आता चाहत्यांना पुजाच्या भूमिकेविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असेल यात शंका नाही. बहुप्रतीक्षित ‘बळी’ हा सिनेमा १६ एप्रिल २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची निर्मिती ‘जीसिम्स’ने केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive