By  
on  

रिंकू राजगुरु झळकणार या दिग्गज अभिनेत्यासोबत

सैराट फेम रिंकू राजगुरुने आता मनोरंजन विश्वात तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सैराटपासूनचा तिचा आता मेकओव्हर थक्क करणारा आहे. सैराट या सिनेमानंतर रिंकू 'कागर', 'मेकअप' या मराठी सिनेमांमध्ये झळकली होती. तर 'हंड्रेड' या वेबसिरीजमधून रिंकूने डिजीटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री घेतली होती. याशिवाय लवकरच 'छुमंतर' या द्विभाषिक सिनेमातून रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

रिंकूला आणखी एका दिग्गज अभिनेत्यासोबत झळकण्याची संधी मिळाली आहे. रिंकू आगामी प्रोजेक्टमध्ये अमोल पालेकर यांच्यासोबत झळकते आहे. इन्स्टा स्टोरीमध्ये रिंकूने आगामी प्रोजेक्टबाबत शेअर केलं होतं. रिंकू सार्थक दासगुप्ता यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. यात अभिनेते अमोल पालेकरही दिसणार आहेत. हा कोर्टरुम ड्रामा असल्याचं सोशल मिडियावरील फोटोंमधून दिसत आहे. रिंकू याबाबत आगामी अपटेड कधी देते याची चाहत्यांना उत्सुकता असेल.

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive