By  
on  

या गोड चिमुकलीला ओळखलं का? अभिनयासोबत गातेही सुरेख

सोशल मिडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात सदोदित असतात. अनेकदा याच माध्यमातून ते चाहत्यांशी खास आठवणीही शेअर करताना दिसतात. आताही अभिनेत्री रसिका सुनीलने चाहत्यांशी खास आठवण शेअर केली आहे. रसिका सुनीलने तिच्या लहानपणीचा एक गोड फोटो शेअर केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

‘लहापणीचा खजिना. मी आणि बाबा. हा फोटो मी याआधी कधीच पोस्ट केला नव्हता. मी फोटोमध्ये इतकी खुश का दिसतीये माहिती आहे? पण 90% यामागचं कारण माझी आई ससा तो कसा हे गाणं गात असणार.’ रसिका अलीकडेच एका गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. "तुम बिन मोहे" असं या गाण्याचं नाव आहे. रसिकाने स्वत: या गाण्याला आवाज दिला असून तिनेच या गाण्याच्या व्हिडीओचं दिग्दर्शन केलेलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive