By  
on  

रवी जाधव सरांसोबत काम करण्याची खुप दिवसांपासूनची इच्छा : अभिनय बेर्डे

रवी जाधव यांच्या आगामी ‘रंपाट’ या सिनेमातून अभिनय मिथूनच्या व्यक्तिरेखेत  रसिकांसमोर येत असलेला अभिनेता म्हणजे अभिनय बेर्डे. अभिनयने त्याला रंपाट्मध्ये रवी सरांनी दिलेल्या संधीबद्दल आभार मानले आहेत. तो म्हणतो, रवी जाधव सर्जनशील कलाकार आहेत. एखाद्या कसलेल्या चित्रकाराप्रमाणे ते सिनेमा रंगवतात. त्यांना पार्श्वसंगीताची देखील उत्तम जाण आहे.

अभिनय रंपाटमध्ये मिथून ही व्यक्तिरेखा साकारत आहे.  स्टायलिश, बिनधास्त आणि दिलफेक असा हा मिथून अभिनेता बनण्यासाठी काहिही करायला तयार असतो. चारचौघांसारखाच फिल्मी डायलॉग सतत तोंडावर असलेल्या मिथूनची पर्सनॅलिटी एकदम भन्नाट आहे. याला अभिनेता बनून फेमस व्हायचं आहे. त्यासाठीच त्याने मायानगरी मुंबईची वाट धरली आहे. अभिनयचा हा तिसरा सिनेमा आहे. त्याने ‘ती सध्या काय करते’ मधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. आता रवी जाधव आणि अभिनय बेर्डे यांची जोडी सिनेमात काय धमाल करते ते लवकरच कळेल. हा सिनेमा १७ मे २०१९ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive