मराठी सिनेमे आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गुणी अभिनेता सुबोध भावे लवकरच एक गाजलेलं नाटक घेऊन रंगभूमीवर येतोय, याची कल्पना खुद्द त्यानेच सोशल मिडीया अकाऊंटवरुन प्रेक्षकांना दिली होती. प्रा. वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले हे गाजलेलं नाटक सुबोध पुन्हा रंगभूमीवर घेऊन येतोय. प्रसिध्द दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतायत.
सुबोध भावे याने आपल्या सोशल मिडीयावर म्हटलंय," रंगदेवता आणि नाट्यरसिक यांना विनम्र अभिवादन करून,सहर्ष सादर करीत आहोत. गेली ५० वर्ष रसिकांच्या हृदयात मानाचं स्थान मिळवणारी प्राजक्ता सारखी सुगंधी कलाकृती "अश्रूंची झाली फुले" शुभारंभ प्रा.वसंत कानेटकर यांच्या नाशिक मधे"
महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाचे फक्त 51चं प्रयोग होणार आहेत. सुबोधसह या नाटकात शेलेश दातार, सीमा देशमुख, उमेश जगताप आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतील.
https://www.instagram.com/p/BwdhWZ8BMtp/?utm_source=ig_web_copy_link
आत्तापर्यंत आपल्या विविध भूमिकांमधून सुबोधने आजवर प्रेक्षकांची मनं जिंकली. रंगभूमीची त्याला पहिल्यापासूनच आवड आहे. आता त्याच्या नाटकातील अभिनयाची सर्वांना आतुरता लागून राहिली आहे.