By  
on  

‘ये ना गावरान मैना’ म्हणत अभिनय साद घालतोय कश्मिराला, ऐका या गावरान गाण्यात

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या रंपाट सिनेमाची रिलीज पुर्वीच हवा होऊ लागली आहे. आता या सिनेमातील ‘ये गावरान मैना’ हे गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याच्या गावरान अंदाज रसिकांना आवडेल यात शंका नाही. या गाण्यात फेट्यातील मिथून आणि अस्सल मराठमोळी वेषातील मुन्नी यांची जोडी खुपच सुरेख दिसत आहे. बेला शेंडे आणि आजच्या जमान्याचा गायक रोहित राऊत यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याला संगीत लाभलं आहे चिनार आणि महेश यांचं. या गाण्याचे गीतकार मंगेश कांगणे आहेत.

https://www.youtube.com/watch?v=ddbRqq4r888&feature=youtu.be

हिरो आणि हिरॉईन होऊन प्रसिद्धी मिळवायची स्वप्न पाहात असलेल्या मिथून आणि मुन्नी यांची गोष्ट रंपाटमध्ये आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनय आणि कश्मिरा ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसत आहे. हा सिनेमा १७ मे २०१९ ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive