By  
on  

राजनंदिनी येणार... उलगडणार विक्रांत सरंजामेच्या भूतकाळाचं रहस्य

‘तुला पाहते रे’ या मलिकेने बघता बघता रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील विक्रांत आणि इशा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. पण सुरुवातीला प्रेयस वाटणा-या विक्रांतचा चेहरा किती भेसूर आहे हे समोर आलं आहे. इशाला विक्रांतच्या कपटीपणाचं सत्य समजलं आहे. या मालिकेत दिवसागणिक उत्सुकता वाढत आहे. यात आणखी एक भर पडणार आहे. या मालिकेत आता बहुप्रतिक्षित अशी राजनंदिनीची एंट्री होणार आहे.

https://www.instagram.com/p/BwjAZrNFrw1/?utm_source=ig_web_copy_link

‘तुला पाहते रे’ मालिकेच्या टायटल ट्रॅकमध्ये शिल्पा तुळसकर ही सावलीसारखी झळकली होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच विक्रांतची पहिली पत्नी म्हणून शिल्पा तुळसकर या मालिकेत झळकणार अशी चर्चा रंगली होती. सोशल मिडियावर वाहिनीने पोस्ट केलेल्या व्हिडियोत राजनंदिनीची एंट्री दाखवली आहे. आता तिची एंट्री इशाच्या आयुष्यात कोणतं नवीन वादळ आणणार हे लवकरच कळेल.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive