मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर ही सिनेमांप्रमाणेच तिच्या फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंन्टसाठीसुध्दा ओळखली जाते. नुकताच गुढी पाडव्याचा सण सर्वांनी घरच्या घरी साध्या पध्दतीने साजरा केला, यानिमित्ताने सईसुध्दा सुंदर अशा ट्रेडीशनल लुकमध्ये पाहायला मिळाली.
गुढी पाडव्यानिमित्त चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी सईने तिचे हे खास फोटो शेअर केले.
पिंक आणि गोल्डन शायनी अशा कॉम्बिनेशनचा शायनी डिझाईनर लेहंगा परिधान केलेली सई खुपच खुलून दिसत होती.
सई ताम्हणकरच्या या फोटोंवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव होत आहे.