By  
on  

या मराठमोळ्या रॅपवर डान्सचा मोह रितेश देशमुखलाही आवरला नाही

सोशल मिडियामध्ये अनेक ट्रेंड, गाणी येत असतात. अनेकदा ही गाणी सेलिब्रिटींनाही मोहात पाडतात. अशाच एका गाण्याने अभिनेता रितेश देशमुखलाही प्रेमात पाडलं आहे. सध्या सोशल मिडियावर ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ हे गाणं ट्रेंड करत आहे. अनेकजण या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

रितेशनेही एक व्हिडियो शेअर केला आहे. यात तो या गाण्यावर लिप्सिंग करताना दिसतो आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून चाहत्यांनी व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. ‘या गाण्याच्या मी प्रेमात पडलोय. धृवन मोर्थी आणि प्रित बंद्रे’  हे कॅप्शन देत त्याने हा व्हिडियो शेअर केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive