By  
on  

सलील कुलकर्णींची कोरोनावर मात, शेअर केली ही पोस्ट

संपूर्ण देशच कोरोनाच्या संकटात सापडला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होतेय. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच कोरोनाची लागण झाली. मराठी सिनेसृष्टीसुध्दा याला अपवाद नाही. काही दिवसांपूर्वीच प्रसिध्द गायक-संगितकार सलील कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा शुभंकर कुलकर्णी यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. चाहत्यांनी त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या. 

सलील कुलकर्णी आणि शुभंकर कुलकर्णी आता कोरोनामुक्त झाले असून त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपण कोरोनामुक्त झाल्याचं सांगितलंय. सलील कुलकर्णी म्हणतात, " देवाच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांच्या आधाराने मी आणि शुभंकर @shubhankarkulkarni__ COVID-19 मधून बरे झाले आहोत.या अवघड काळात आमची सतत काळजी घेणारी माझी आाई , माझी बहीण आसावरी , माझी मुलगी अनन्या , भाचा @ashwin_ranade , भाची देवकी, आमचा driver and family member चिंतामणी... माझे सगळे नातेवाईक देशातले आणि परदेशातले मित्र , मैत्रिणी , चाहते ह्यांच्या काळजी आणि प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत."

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive