By  
on  

लाल भरजरी साडी, हिरवा चुडा आणि गजरा अमृता खानविलकरचा साजच न्यारा !

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नुकतंच गुढीपाडवा सण घरोघरी उत्साहात साजरा झाला. अमृतानेसुध्दा कुटुंबियांसोबत गुढी उभारुन नवीन वर्षाचं स्वागत केलं. सोशल मिडीयावर चाहत्यांना शुभेच्छा देताना अमृताचा खास मराठमोळा लुक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत होता. 

 

 

लाल रंगाची जरीकाठाची भरजरी साडी, निळ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज आणि केसात माळलेला गजरा अशा मराठमोळ्या साजातले अमृताचे हे फोटो चाहत्यांना घायाळ करतायत.  

 

चाहत्यांना अमृताचा हा साडीतला लय भारी फेस्टिव्ह लुक प्रचंड आवडला असून त्यांनी तिच्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

 

अलिकडेच अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग या जोडीचा वेल डन बेबी हा सिनेमा एमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्म रसिकांच्या भेटीला आला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive