By  
on  

रवी जाधव ह्यांच्या मुन्नी आणि मिथुनचं पहिलं 'रंपाट' पोस्टर

रवी जाधव ह्यांच्या ढिंच्च्याक 'रंपाटचं' पहिलं पोस्टर नुकतंच उलगडलं . दिग्दर्शक रवी जाधव यांनीच आपल्या सोशल मिडीया अकांऊटवरुन हे पोस्टर चाहत्यांच्या भेटीस आणलं आहे. "बडे बडे शहरों में एक दिवस आपले पण मोठे मोठे पोस्टर लागतील असे स्वप्न पाहणाऱ्या मुन्नी आणि मिथुनचं पहिलं रंपाट पोस्टर", अशी हटके टॅगलाईन देत ते सर्वांसमोर सादर केलं आहे आणि ह्या पहिल्यावहिल्या पोस्टरमुळे सिनेमाबाबतची उत्सुकता आता आणखी वाढली आहे.

येत्या 17 मे रोजी 'रंपाट'ची धम्माल संपूर्ण महाराष्ट्रभर अनुभवता येणार आहे.

https://www.instagram.com/p/Bwn8fWSll9v/?utm_source=ig_web_copy_link

 

या सिनेमात अभिनयच्या व्यक्तिरेखेचं नाव मिथून आहे. स्टायलिश, बिनधास्त आणि दिलफेक मिथून रसिकांना आवडेल यात शंका नाही. यासोबतच रवी यांनी सिनेमाची हिरॉईन कश्मिरा हिचा व्हिडियोही शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना रवी म्हणतात, "हिला बघून भल्याभल्यांच्या छातीत भरते धडधड! ही आहे आतून कणखर, बाहेरून कडकड!!
कोल्हापूरच्या ‘रंपाट’ मुन्नीच्या भूमिकेत कश्मिरा परदेशी " त्यामुळे आता सर्वांनाच या हटके सिनेमाच्या प्रदर्शनाचे वेध लागले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive