By  
on  

‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडे अपघातातून थोडक्यात बचावली

‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे अभिनेत्री गौतमी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. या मालिकेतली सई म्हणून गौतमीने रसिकांची मनं जिंकली आहेत. तिची आणि विराजसची या मालिकेतली केमिस्ट्री अफलातून आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून गौतमी देशपांडे सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. आताही तिने खास पोस्ट शेअर केली आहे. कामानिमित्त गौतमी वरचेवर मुंबई पुणे असा प्रवास करावा लागतो.

 

पण काही दिवसापुर्वी खोपोली जवळ आल्यावर तिची गाडी स्लिप होऊ लागली. गौतमीने लगेच तिची गाडी डावीकडे थांबवली. पण त्याचवेळी माझ्या मागून आलेली गाडी स्लिप झाली आणि धडकली. पण गाडीत असणाऱ्या कोणालाही दुखापत झाली नाही.
यानंतर गौतमीने पोस्ट शेअर करत किस्सा व्यक्त केला आहे. ‘माझी काळजी करु नका.. माझा अपघात झालेला नाही. मी सुखरुप आहे. मी माझा अनुभव सांगितला जेणे करुन इतरांना मदत होईल. माझा अपघात झाल्याच्या अफवा पसरवणारी लोकं खरच मुर्ख आहेत.’ चाहत्यांनी कमेंट्समधून तिची काळजी व्यक्त केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive