By  
on  

प्राजक्ता माळीचा लॉकडाऊनसाठी हा आहे प्लॅन

सध्या करोनाचा भस्मासूर आपले हात-पाय पसरत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यावर लॉकडाऊनचा पहारा पुन्हा एकदा बसला आहे. जसं काही लॉकडाऊनचा हा दुसरा सीझन सुरु झाला आहे. लॉकडाउनच्या या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी काहींनी वेळापत्रकही बनवले आहेत. आपले छंद जोपासण्यासह, घरातील काम करणं यासाठी आखलेलं वेळापत्रक काही जण फॉलो करत आहेत.  

 

 

अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही लॉकडाऊनचा फंडा चाहत्यांशी शेअर केला आहे. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘ तुकाराम महाराज सांगतात ...‘आलिया भोगासी- असावे सादर..’  .तेव्हा ही सक्तीची सुट्टी चिंतेत नाही, चिंतनात घालवूया.. थोडक्यात सत्कारणी लावूया...निदान प्रयत्न तरी करूया’ यासोबतच तिने तुकाराम महाराजांचं अभंग आणि निरुपणाचा फोटोही शेअर केला आहे. यासोबत तिने सुरेख काठपदाराच्या साडीचा फोटोही शेअर केला.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive