By  
on  

अभिनेत्री अनुजा साठेने रिकव्हरीची गोड बातमी चाहत्यांशी केली शेअर

करोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतो आहे. अनेक सेलिब्रिटीही करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. मध्यंतरीच्या काळात कमी झालेला करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. मुख्य म्हणजे मागील लाटेपेक्षा या लाटेने अधिक रौद्ररुप धारण केलं आहे. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री अनुजा साठेही करोनाच्या तडाख्यात सापडली.

 

 

अनुजाने पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली होता. माझा करोनाचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. हे सगळं खरच खुप वाईट आहे. प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या.’ हे कॅप्शन देत तिने करोना झाल्याचं चाहत्यांशी शेअर केलं होतं. 
पण आता अनुजाने एक गुड न्युज शेअर केली आहे. ‘माझी चव आणि वासाची जाणीव परत आल्याचा आनंद वेगळाच’ हे कॅप्शन देत तिने रिकव्हरीची गोड बातमी शेअर केली आहे. अनुजा आता ‘एक थी बेगम 2’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive