By  
on  

'मेरे होठों ने हर बात छुपा कर रखी थी..' म्हणत श्रृतीने शेअर केला बोल्ड फोटो

मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री श्रृती मराठेने आपलं खास स्थान निर्माण केलं आहे. छोट्या पडद्यावरील राधा ही बावरी या मालिकेतून सर्वप्रथम श्रृतीने रसिकांची मनं  जिंकली. त्यानंतर मालिका आणि सिनेमांमधून श्रृती आपल्या अभिनयाची छाप पाडते.

 मराठी सिनेसृष्टीसह दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाची चमक श्रृती दाखवते. दक्षिणात्य इंडस्ट्रीत श्रृती ही श्रृती प्रकाश या नावाने ओळखली जाते. श्रृती सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिने नुकताच एक बोल्ड फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. 

 

या आऊटफिटमध्ये श्रृतीच्या  सौंदर्यांला चार चॉंद लागले आहेत.  तसंच या फोटोला दिलेलं कॅप्शनही लक्षवेधी ठरतंय. श्रृती म्हणते..."मेरे होठों ने हर बात छुपा कर रखी थी,आँखों को ये हुनर कभी आया ही नहीं"

 

श्रुती मराठे आगामी 'सरसेनापती हंबीरराव' या ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. प्रवीण तरडे या चित्रपटाचं दिग्दर्शन करतायत.

 

 

तसंच करोना लॉकडाऊननंतर श्रृतीने कामाचा श्रीगणेशा केला. आगामी आगामी तमिळ सिनेमाच्या शूटींगचं शेड्यूल चेन्नईत पूर्ण करुन ती नुकतीच परतली आहे. हा कन्नड सिनेमा ‘मायाबाजार’चा रिमेक आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive