By  
on  

चार्ली चॅप्लिन यांच्या जन्मदिनी या मराठमोळ्या अभिनेत्याने केलं खास अभिवादन

चार्ली चॅप्लिन, हा मूकपटांमध्ये अभिनय करणारा इंग्लिश अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार होता. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती. निर्वविवाद कलागुणांनी चार्ली चॅप्लिन यांनी जगभरच्या प्रेक्षकांवर राज्य केलं. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर ते गारुड करू  शकले. त्यांचं खासगी आयुष्य हेसुध्दा नाट्यमयच राहिलं. भाषेच्या बंधनाविना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू!

म्हणूनच जगातल्या या महान विनोदवीराला आदरांजली देण्यासाठी मराठमोळा अभिनेचा संदीप पाठकने त्यांच्या जन्म दिवसाचं ओचित्य साधलं आहे. चार्ली चॅप्लीन यांच्या वेषभूषेतले फोटो शेअर करत संदीप म्हणतो," आज माझ्या देवाचा म्हणजेच विश्वविख्यात "चार्ली चॅपलीन"  चा जन्मदिवस. आभाळाएवढ्या ह्या कलावंताची नक्कल, अनुकरण करण्याचा मोह कोणाला होणार नाही 'सगळ्यांनाच' त्याच्या श्टाईल ने फोटोशुट करूया आणि त्याला आजच्या दिवशी अभिवादन करूया हा एक छोटा कलाकार म्हणून माझा प्रयत्न.गोड मानून घ्या  चार्ली चॅपलीन म्हणतो की " माझं आयुष्यच नाट्यमय आहे.तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच.त्यातील सारं वास्तव मी स्वत:च अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात.नकळत मी लोकांना जीवनातलं दु:ख दाखवून देतो.' तर असा हा हसऱ्या मुखवट्यातून वेदनेचा सूक्ष्म वेध घेणारा महान कलावंत. या "मनस्वी"कलावंताला अभिवादन "

 

 

संदीप पाठकचं हे खास फोटोशूट चाहत्यांना प्रचंड आवडलं असून त्यांनी त्यावर लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive