By  
on  

'रंग माझा वेगळा'मधील श्वेता आहे या प्रसिध्द व्यक्तीची लेक

'रंग माझा वेगळा' ही मालिका छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील सर्वच पात्र रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतात. या मालिकेत खलनायिका म्हणून घराघरांत पोहचलेली श्वेता ही नायिका दीपाची सावत्र बहिण दाखवली आहे. नकारात्मक भूमिका आणि आपल्या दुष्ट कारवायांमुळे श्वेता प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडतेय .

श्वेता साकारणारी अभिनेत्री अनघा अतुल सोशल मिडीयावरसुध्दा बरीच लोकप्रिय ठरते. पण तुम्हाला माहितीय का श्वेता कोण आहे, ते...फारच कमी लोकांना माहितीय की, श्वेता ही भगरे गुरुजींची लेक आहे. 

अनघा अतुल भगरे. अनघ ही भगरे गुरुजींची कन्या आहे. झी मराठी वाहिनीवर गेली कित्येक वर्ष वेध भविष्याचा या कार्यक्रमामुळे भगरे गुरुजी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचले आहेत. त्यानंतर आता घेतला वसा टाकू नको या मालिकेतून भगरे गुरूजी पौराणिक कथा आणि त्यामागचं महत्त्व महाराष्ट्राला उलगडून दाखवतात. 

 

'रंग माझा वेगळा' ही अनघाची पहिलीच टीव्ही मालिका. अनघाने अनन्या या रेकॉर्डब्रेक नाटकातसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. 

भगरे गुरुजी आपल्या विशिष्ट शैलीने रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात तर त्यांची लेक अनघा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकते.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive