By  
on  

या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लवकरच वाजणार सनई चौघडे

करोनाची दुसरी लाट येण्यापुर्वी अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले. या वर्षांच्या सुरुवातीला अनेकांनी मनपसंत जोडीदाराशी लग्नगाठ बांधली. आता आणखी एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी सज्ज आहे. लव्ह, लग्न, लोचा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री रुचिता जाधव लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

 

 

ती मुंबईतील व्यावसायिक आनंद मानेशी लग्न करणार आहे. पाचगणी येथील एका फार्महाऊसवर ही जोडी लग्नाच्या बेडीत अ‍डकणार आहे. रुचिता आणि आनंदचं हे अरेंज मॅरेज आहे. 3 मेला हा लग्नसोहळा पार पडणार आहे. रुचिताने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. मागील वर्षी लॉकडाऊनपुर्वी आम्ही भेटलो. त्यावेळी लग्नाचा विचार डोक्यात नव्हता. पण डिसेंबर 2020मध्ये आम्ही हा निर्णय घेतला असं रुचिताने सांगितलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive