By  
on  

अस्सा नवरा हवा गं बाई !!! जुई गडकरीच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं

सध्या लॉकडाऊनच्या दुस-या सीझनमध्ये आपण आहोत. मागील वर्षीप्रमाणेच बाहेर पडण्यावर ब-याच अंशी बंधनं आली आहेत. सामान्य व्यक्तीप्रमाणेच सेलिब्रिटीही घरी आहेत. अभिनेत्री जुई गडकरीही या लॉकडाऊनला कंटाळली आहे. 
त्यामुळे तिने एक सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली. पुन्हा कर्फ्यू... घरात बसून कंटाळला आला... तुम्ही मला विचारा आणि मी ते पोस्ट करेन अशा आशयाची पोस्ट तिने चाहत्यांशी शेअर केली.

 

यामध्ये एका फॅनने तिला पार्टनर दिसायला कसा हवा हे विचारलं. या प्रश्नाला उत्तर देताना जुई म्हणते, ‘दिसणं खरंच महत्त्वाचं असतं का?  हो.. पण जर एखाद्या व्यक्तीचं तुमच्यावर मनापासून प्रेम असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कसे दिसता हे महत्त्वाचे नसतं’. तिच्या या उत्तराचं नेटिझन्स कौतुक करत आहे.  जुई यापुर्वी तुझविण सख्या रे, पुढचं पाऊल, वर्तुळ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive