By  
on  

पाठकबाई म्हणतात, नाद करायचा नाय... पाहा Video

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. मालिकेतली तिची अंजलीबाई म्हणजेच पाठकबाई ही व्यक्तिरेखा छोट्या पडद्यावर चांगलीच गाजली. याशिवाय राणादा आणि अंजलीबाईंची केमिस्ट्रीसुध्दा प्रेक्षकांना तुफान भावली. या मालिकेने अलिकडेच म्हणजेच काही महिन्यांपूर्वीच रसिक प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण तरीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाठकबाई फेम अक्षया देवधर चाहत्यांच्या संपर्कात असते. मालिकेने निरोप घेतला असला तरी तिच्या लोकप्रियतेत तसूभरही फरक पडलेला नाही. तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. 

सोशल मिडीयावरुन आपले विविध लुक्स आणि झक्कास व्हिडीओमधून अक्षया चाहत्यांचं मनोरंजन करते. आतासुध्दा अक्षयाने तिचा एक नखरेल व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. नाद करायचा नाय...असं ती यात म्हणतेय. तुम्हालासुध्दा हा व्हिडीओ प्रचंड आवडेल. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

अक्षया या व्हिडीओत मराठमोळ्या साजात सजलेली पाहायला मिळतेय. तिच्या या मनमोहक व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive