By  
on  

भरत जाधवचं चाहत्यांना आवाहन, “ही वेळ एकमेकांना आधार देण्याची आहे”

देशात सध्या करोनाची दुसरी लाट उसळली आहे. दररोज करोनाबाधित रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. तर, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. सरकारकडून करोना संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती, कडक निर्बंध, लॉकडाउनसह वैद्यकीय यंत्रणा अधिक गतीमान व बळकट करण्याचे काम सुरू आहे. अभिनेता भरत जाधवने देखील चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे करोनाच्या या संकट काळात खबरदारीने वागण्याचं आवाहन केलं आहे. 

भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता. या फोटोत भरतने हात जोडल्याचे दिसत आहे.  भरतने करोना संबंधीत एक महत्त्वाचा संदेश त्याच्या चाहत्यांना दिला आहे. “स्मारकं वर्षभरापासून बंद आहेत.. पण रुग्णालये २४ तास सुरू आहेत.. निदान या पुढे तरी काळाची गरज ओळखता आली पाहिजे. आयुष्याशी झुंजणा-या प्रत्येकासाठी प्रार्थना करा. त्या सगळ्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, तिथले शिपाई, बाकी मेडिकल स्टाफ यांच्याबद्दल कृतज्ञ रहा. ही वेळ एकमेकांना आधार देण्याची आहे,” असं भरतने लिहलं होतं. पण काही वेळातच त्याने ही पोस्ट काढून टाकली  आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive