By  
on  

बिकीनीत दिसली 'टकाटक' गर्ल, गोव्यात करतेय चिल

'टकाटक' सिनेमामुळे प्रसिध्द झालेली बोल्ड अभिनेत्री म्हणजेच प्रणाली भालेराव . टकाटक गर्ल हीच आता तिची ओळख बनली आहे. प्रणालीच्या डान्सचा जलवासुध्दा युवा डान्सिंग क्वीन्स या डान्स रिएलिटी शोमध्ये पाहायला मिळाला. तिच्या डान्सलाही प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दिली. मॉडेलिंगची आवड असणारी प्रणाली अनेकदा तिचे मनमोहक फोटोशूट चाहत्यांशी शेअर करते. 

 

'टकाटक' या सुपरहिट सिनेमाचा लवकरच दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या सिनेमाच्या शूटींगचा श्रीगणेशा नुकताच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गोव्यात झाला.या भागासुध्दा प्रणालीच नायिका आहे. यानिमित्ताने गोव्यात चिल करताना प्रणाली पाहायला मिळाली.

 

 

स्विमींग पूलमध्ये प्रणालीचा बोल्ड अंदाज पाहून चाहते नक्कीच घायाळ झाले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Takatak Film (@takatakfilm)

 

मिलिंद कवडे दिग्दर्शित ‘टकाटक’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमवला. या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब, अभिजीत आमकर, रितीका श्रोत्री, प्रणाली भालेराव हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये होते. अडल्ट कॉमेडी असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली.. आता या चित्रपटाचा सिक्वेलही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिक्वेलचं चित्रीकरण 7गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सुरु झाल्याची माहिती अभिनेता प्रथमेश परबने आणि अभिनेत्री प्रणाली भालेरावने दिली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive