By  
on  

लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवणा-या गली क्रिकेटर्सवर ही अभिनेत्री भडकली

करोना हा शब्द आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा जणू भागच होऊन गेला आहे.  करोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतो आहे. अनेक सेलिब्रिटीही करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. मध्यंतरीच्या काळात कमी झालेला करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. मुख्य म्हणजे मागील लाटेपेक्षा या लाटेने अधिक रौद्ररुप धारण केलं आहे. पण अजूनही काही लोकांना अजूनही याचं गांभीर्य समजलेलं दिसत नाही. या संदर्भातील एक पोस्ट अभिनेत्री हेमांगी कवीने शेअर केली आहे.

 

 

हेमांगी म्हणते, *IPL पेक्षा ही जास्त पैसा इथे लागलेला आहे
*रस्त्यावर यायच्या आधी 14 दिवस यांना quarantine करण्यात आलं होतं
*दर ७२ तासांनी या सर्व खेळाडूंची RTPCR test करण्यात येते
*दर 1 तासाने Bat आणि Ball sanitize करण्यात येत आहेत
*मास्क न लावता खेळण्याची परवानगी काढण्यात आलेली आहे ( मास्क घालून कसं खेळणार, runs कमी नाही का होणार, वेडीच आहे मी) 
*Break Time मध्ये शक्तिवर्धक काढा पेय म्हणून देण्यात येत आहे!
*खेळून झाल्यावर या सर्व खेळाडूंना social bubble मध्ये ठेवण्याची व्यवस्था केली आहे
Background ला दर 2 तासांनी ambulance च्या आवाजाने खेळाची रंजकता अजूनच वाढतेय! 
तर, कळवण्यात अत्यंत आनंद होतोय की lockdown अजून 15 दिवस काय 15 वर्ष लागला तरी काही हरकत नाही! 
त. टी.: खेळा cricket ... काढा corona ची wicket!
- एक जबाबदार (जळखाऊ) नागरिक!

Author

Recommended

PeepingMoon Exclusive