By  
on  

दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांच्यासोबत गैरवर्तन, व्हिडियो केला शेअर

सेलिब्रिटींसोबत सार्वजनिक आयुष्यात अनेकदा गैरवर्तन घडत असतं. दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांच्यासोबतही असंच काहीसं घडलं आहे. स्वप्ना यांच्यासोबत एका व्यक्तीने गैरवर्तन केलं आहे. निर्माते अशोक पंडित यांनी हा व्हिडियो ट्वीटरवर शेअर केला आहे. स्वप्ना यांनी या घटनेविरोधात सोशल मिडियावर संताप व्यक्त केला आहे.

https://twitter.com/ashokepandit/status/1121327837863120897

पार्किंगमध्ये एका व्यक्तीने जोरात दरवाजा उघडल्याने स्वप्ना यांच्या गाडीचा रेअर व्हयु मिरर तुटला. अशा वेळी त्या व्यक्तीने माफी मागण्याऐवजी उद्धट वर्तन केलेच याशिवाय स्वप्ना यांना वाईट भाषेत संवाद साधला. या सगळ्या प्रकारानंतर स्वप्ना यांनी व्हिडियो पोस्ट केला असून या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

https://twitter.com/ashokepandit/status/1121315704530198528

स्वप्ना या यशस्वी दिग्दर्शिका असून त्यांनी आतापर्यंत 'मितवा', 'सविता दामोदर परांजपे', 'लाल इश्क', फुगे', 'तुला कळणार नाही' हे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive