By  
on  

Video : करोना उपचारासाठी रेमडेसिवीर मिळत नसेल तर हा आहे पर्याय : डॉ. अमोल कोल्हे

करोनाच्या दुस-या लाटेने सध्या देशासह राज्यात धुमाकुळ घातलाय. यामुळे आरोग्य यंत्रेणेसह प्रशासनावरचा ताण प्रचंड वाढलाय. यातच नवनवी संकंटं उभी राहतायत. ती म्हणजे बेड्स अपुरे पडतायत, ऑक्सीजनचा साठा संपतोय तर रेमडेसिवीर हे करोना उपचारामधील महत्त्त्वाचं ठरणारं इंजेक्शनचा राज्यात मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासतोय. रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळवण्यासाठी खुप आटापिटा करावा लागतोय .दिवसरात्र मेडीकल दुकानांच्या बाहेर रांगा लावाव्या लागतायत. सध्या हेच सर्वत्र पाहायाला मिळतंय.

करोनाबाधित रुग्णांना उपचारादरम्यान दिलं जाणारं रेमडेसिवीर हे इंजेक्शन  मिळवताना रुग्णांच्या नातेवाईकांची खुप वणवण होते. अशातच सामाजिक भान जपणारे अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे  यांनी रेमडेसिवीरला पर्यायी कोणतं औषध आहे, याबाबत नागरिकांना सोशल मिडीयावरुन माहिती दिली आहे.

 

'रेमडिसिवीरच्या वापराबाबत कोविड टास्क फोर्सने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा व्हिडिओ केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात एक महत्वाची प्रतिक्रिया अशी होती की, डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिलंय पण ते आता मिळत नाही. या परिस्थितीत काय करावे? लक्षात घ्या, रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. शरीरातील विषाणूंचा भार कमी करण्यासाठी ते दिलं जातं. परंतु जर ते उपलब्ध झालं नाही तर कोविड टास्क फोर्सने पर्यायी औषध फेव्हीपॅरावीर हे सुचवलं आहे. ते रुग्णाला द्यावं. शासन व प्रशासन रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे,' अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive