By  
on  

“देशाला लागलेली करोनापेक्षा घातक आणि पोखरणारी कीड म्हणजे राजकारण"

सध्या देशात करोनाच्या दुस-या लाटेने धुमाकुळ घातला आहे. राज्यात तर करोनाचा कहरच सुरु आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण बसतोय. यातच नवनवी संकंटं उभी राहतायत. ती म्हणजे बेड्स अपुरे पडतायत, ऑक्सीजनचा साठा संपतोय तर रेमडेसिवीर हे करोना उपचारामधील महत्त्त्वाचं ठरणारं इंजेक्शनचा राज्यात मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासतोय. यात रुग्णांचे खुप हाल होतायत. याच सद्य परिस्थितीवर मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने भाष्य केलं आहे.

तेजस्विनीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीतून बिकट परिस्थितीतसुध्दा सुरु असलेल्या राजकारणावर संताप व्यक्त केला आहे. तेजस्विनी म्हणते सगळ्यात मोठी “कीड” जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे “राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या “कीड”पासून बचाव करता आला तर बघा! ..अवघड आहे सगळंच…काळजी घ्या.”

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive