By  
on  

रिंकू राजगुरुचं हे नवं फोटोशूट पाहिल्यावर तुम्हाला याड लागल्याशिवाय राहणार नाही

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. रिंकूने नुकताच तिच्या नजाकत आणि अदाकारीने सजलेले छानसे फोटो पोस्ट केले आहेत. महत्त्त्वाचं म्हणजे यात रिंकूचा नवा लुक पाहायला मिळतोय. तिने नुकताच हेअरकट केलाय. त्यामुळे तिचा हा नवा लुक चाहत्यांच्या खुप पसंतीस पडतोय. 

रिंकू सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. खासकरुन तिच्या विविध लुकमधील व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करते. शॉर्ट हेअरकटमध्ये केसात माळलेलं लाल रंगाचं फुल आणि हा सनकिस्ड फोटो रिंकूच्या चाहत्यांना घायाळ करतोय.

 

 

उन्हाळ्यामुळे रिंकूने केलेला हा हेअरकट तिलाही भलताच आवडला आहे.  चाहते म्हणतात, याड लागलं गं याड लागलं गंं...रंगलं तुझ्यात याड लागलं गं..'सैराट'मध्ये पाहिलेली आर्ची आणि 'सैराट'नंतर रिंकूमध्ये झालेल्या बदलाने तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा 'याड' लावलं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive