By  
on  

अमेय वाघचा हा संडे-फंडे व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही

नेहमीच भन्नाट पोस्ट करत चाहत्यांना सरप्राईज करणा-या मराठी सिनेसृष्टीच्या वाघाने म्हणजेच अभिनेता अमेय वाघने एक धम्माल पोस्ट करत हास्याचे कारंजे उडवले आहेत. रविवारचा दिवस होता तेव्हा संडे फंडे मूडमध्ये असलेल्या अमेयने गार्डनमध्ये चक्क सायकल चालवली आणि ही साधी-सुधी सायकल नाही बरं का...तर चक्क लहान मुलांची सायकल..त्यातही त्याला ब्रेक्स नाहीत व चाकं पंक्चर झालेली. आई मला खेळायला जायचंय... जाऊ दे न वं...या नाळ सिनेमातल्या चैत्याच्या लाडिक गाण्यावर अमेयने मनसोक्त सायकल चालवलीय. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

 

अमेयच्या या भन्नाट पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि धम्माल कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.  

अमेय लवकरच अजय सरपोतदार दिग्दर्शित झोम्बिवली या पहिल्या मराठी झोंबीपटात झळकतोय. त्याच्यासोबत या सिेनमात अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री वैदही परशुरामी झळकतेय. 

तसंच अमेय कारखानीसांची वारी या सिनेमातसुध्दा प्रमुख भूमिकेत आहे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive