By  
on  

दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या मुलाच्या उपचारासाठी मराठी अभिनेत्याने दिली मदतीची हाक

‘माझ्या नव-याची बायको, ‘तू माझा सांगाती’ या मालिकांमध्ये काम केलेला अभिनेता अतुल विरकर याने चाहत्यांना मदतीचं आवाहन केलं आहे. अतुलचा मुलगा प्रियांशला एक दुर्मिळ आजार आहे. यामुळे तो मान पकडू शकत नाही. त्यासाठी येत असलेल्या औषध उपचारांचा खर्च हा अतुलच्या आवाक्याबाहेरचा आहे. 

 

 

त्यामुळे अतुलने मुलाच्या उपचारासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे. लॉकडाऊनमुळे अतुलकडे कोणतंही काम नसल्याने मुलाच्या उपचाराचा खर्च करणं त्याला शक्य नाही. भारतात अशा आजाराचा तो एकमेव रुग्ण आहे. डेव्हलपमेंट डिले डिसऑर्डर असं या रोगाचं नाव आहे. प्रियांशला उपचारासाठी आठ ते दहा लाख रुपयांची गरज आहे. अभिनेता वरद चव्हाणनेही पोस्ट शेअर करत अतुलला मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive