By  
on  

या फोटोतील चिमुकलीला ओळखलं का? तिच्या गाण्यांनी लावते सगळ्यांना वेड

अभिनेत्री, गायिका प्रियांका बर्वे सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिच्या आगामी प्रोजेक्टबाबत चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिने आजी आणि प्रसिद्ध गायिका मालती पांडे यांच्यासोबतची खास आठवण शेअर केली आहे. आज गायिका मालती पांडे यांची जयंती आहे. यावेळी प्रियांकाने आजीसोबत लहानपणीचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

 

 

प्रियांका आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘आज मालती आजीची जयंती. ही आठवण खूप प्रिय आहे. हा फोटो आजीच्या गुरूपौर्णिमेचा. माझा पहिला रंगमंचीय अविष्कार. त्या तिथे पलिकडे ही आज्जीचं गाणं मी सादर केलं होतं आणि गाणं झाल्यावर मीच टाळ्या वाजवल्या. आजी तुझी गाणी मी कार्यक्रमात गाते आणि आजही ती गाणी लोकांना तेवढीच आवडतात. तू तुझ्या गाण्यांमधून आजही आमच्याबरोबर आहेस आणि राहशील.तुझे आशीर्वाद असेच असूदेत. तुला कोटी कोटी प्रणाम.  प्रियांकाने आनंदी गोपाळ, रमा-माधव, पानीपत या सिनेमांमधील गाणी गायली आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive