By  
on  

" महाराष्ट्र जनतेच्या मागे उभा असलेला एकमेव ‘राजा’ माणूस”

करोनाच्या दुस-या लाटेने राज्यासह देशात थैमान घातलंय. आरोग्य यंत्रणेवर प्रंचड ताण आला आहे.  बेड्स अपुरे पडतायत, ऑक्सीजनचा तुटवडा भासतोय तर रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेनासं झालंय.म्हणूनच लवकरात लवकर नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं सरकारने लक्ष्य आखलं आहे.  केंद्र सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सोमवारी घेतला. याअंतर्गत १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. लसीकरणाचा पुढचा टप्पा १ मेपासून सुरू होणार आहे. 

 या निर्णयाचं राज्यातील ठाकरे सरकारनेही स्वागत केलं आहे. असं असतानाच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मात्र या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. यासंदर्भात केदार शिंदे यांनी एक पोस्ट केली आहे. 

केदार शिंदे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “राज ठाकरे, आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या. अपुनने एकही मारा लेकीन सॉलिड मारा के नाही?,” असं शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच राज यांचा उल्लेखही शिंदे यांनी, “या काळात राजकारण न करता महाराष्ट्राच्या जनतेच्या मागे उभा असणारा एकमेव राजा”, असा केला आहे. 

 

 

केदार शिंदेंच्या या पोस्टकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या असून ह्या पोस्टची चर्चा रंगलीय. काही दिवसांपूर्वीच लसींची संख्या वाढवण्यासाठी हाफकीन सारख्या संस्थांना लस निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी आपण केली होती, जी पंतप्रधानांनी मान्य केली असे ट्विट राज ठाकरे यांनी केलं होतं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive