By  
on  

छोट्या दोस्तांसोबत संदीप पाठकचा भन्नाट व्हिडीओ पाहा

भारतात झालेल्या करोना उद्रेकामुळे आरोग्य यंत्रणेवर बराच ताण पडतोय. बेड्स अपुरे पडतायत, ऑक्सीजनचा तुटवडा भासतोय तर रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेनासं झालंय.म्हणूनच लवकरात लवकर नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं सरकारने लक्ष्य आखलं आहे. जबाबदार नागरिक म्हणून आपणंही योगेय ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. अनेक कलाकारसुध्दा सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करतायत. 

अभिनेता संदीप पाठक सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. त्याच्या धम्माल रील्स व्हिडीओंची नेहमीच चर्चा रंगते.आत्तासुध्दा  एक भन्नाट व्हिडीओ पोस्ट करत संदीपने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. डान्सचा धमाकेदार व्हिडीओ शेअर करण्यासोबतच संदीपने सामाजिक संदेशही दिला आहे. 

 

सोसायटीतल्या लहान मुलांसोबत ताल धरताना संदीपने चाहत्यांना करोना काळात घरच्या घरी सोप्या पध्दतीने काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. संदीप म्हणतो, " मी माझ्या सोसायटीतल्या ( संकल्प- विवेक) छोट्या मित्रांसोबत रील केली आहे. ह्या छोट्या मित्रांचा अभिनय क्षेत्राशी काही संबंध नसताना त्यांनी ह्या रील चं शुटींग खूप Enjoy केलं Thanks Friends सध्याच्या कोरोना काळात "स्वत:ची काळजी घ्या" एवढा संदेश देण्याचा छोटा प्रयत्न. गोड मानून घ्या"

संदीप  आणि छोट्या दोस्तांच्या वाथी कमिंगच्या या धम्माल डान्सवर कौतुकाचा वर्षाव होतोय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive