By  
on  

अभिनय कश्मिराच्या ‘रंपाट’ जोडीचा या गाण्यातला धुमाकुळ आवर्जून पहाच

रवी जाधव दिग्दर्शित ‘रंपाट’ सिनेमा रसिकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमातील गाणीही रसिकांना वेड लावत आहेत. या सिनेमातील आणखी एक गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. ‘ये ना ये ना’ असे बोल असलेलं हे गाणं रसिकांच्या खास पसंतीस उतरलं आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे याला तीन वेगवेगळे मूड आहे.

पहिल्यांदा हे गाणं बॉलिवूड थीमवर आधारलेलं आहे तर दुस-या थीममध्ये ८०च्या दशकाची झलक दिसते. तिस-या थीममध्ये माहोल एकदम मराठमोळा होऊन जातो. बेला शेंडे आणि आजच्या जमान्याचा गायक रोहित राऊत यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याला संगीत लाभलं आहे चिनार आणि महेश यांचं. या गाण्याचे गीतकार मंगेश कांगणे आहेत. स्वत:च्या स्वप्नांच्या मागे लागताना एकमेकांत गुंतत जाणारी ही जोडी रसिकांचं मनोरंजन करेल यात शंका नाही.

हा सिनेमा १७ मे २०१९ ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

https://www.youtube.com/watch?v=icQiD24dPFw

Recommended

PeepingMoon Exclusive