By  
on  

सलील कुलकर्णी यांनी शेअर केली या गाण्याची आठवण

प्रसिध्द संगीतकार, गायक आणि सिनेदिग्दर्शक डॉ.सलील कुलकर्णी हे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. आपल्या आगामी सिनेमाबद्दलचे , गाण्यांचे, लाईव्ह कॉन्सर्टचे अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहचवत असतात. आताही त्यानी खास गाण्याची आठवण शेअर केला आहे. आपला पोस्टमध्ये ते म्हणतात, मला उडु उडु झालंया... 2017 मध्ये नितीन कांबळे दिग्दर्शित " लडतर " ह्या चित्रपटासाठी केलेलं हे गाणं...चित्रपट लवकर प्रदर्शित होईलच ...

 

 

गेल्या काही दिवसात अचानक trending आहे असं बघतोय. आपल्या चालीवर - गाण्यावर शेकडो मंडळी धमाल नाचून , इंस्टाग्राम वर reels करून post करत आहेत ह्याची खूप मजा येतिये.. अनेकांना गाणं कोणाचं आहे ..कुठलं आहे हे ठाऊक देखील नाही पण मंडळी धमाल नाचतायत हे महत्वाचं.

माझा मित्र समीर सामंत ने कमाल लिहिलंय आणि आमचे आनंद भाऊ शिंदे ह्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत तुफान गायलं आहे. आज पुन्हा एकदा रेकॉर्डिंग च्या आठवणी जाग्या झाल्या. रसिकांचे मनापासून आभार !! सलील आगामी ‘एकदा काय झालं’ या सिनेमातून भेटीला येत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive