By  
on  

सिंपल में डिंपल! सायलीच्या अदा चाहत्यांना करतील फिदा

'काहे दिया परदेस' या मराठी मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण करणा-या सायली संजीवली यातील नायिका गौरीच्या भूमिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख मिळाली. त्यानंतर विविध सिनेमांद्वारे सायली रसिकांच्या भेटीला आली. आता मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून सायली संजीवने अल्पावधितच आपलं स्थान निर्माण केलं आहे. 

सोशल मिडीयावर सायली सतत सक्रीय असते. आपल्या आगामी प्रोजेक्टसबद्दल चाहत्यांना अपडेट ठेवते. अनेक विविध सिनेमे आणि सध्या शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून सायली प्रेक्षकांच्या भेटीला येते. 

नव्या वर्षात एक स्टायलिश फोटोशूट सायलीने चाहत्यांशी शेअर केलं आहे.

सायली या सिंपल लुक्समध्ये खुपच गोड दिसतेय. 

आता ती गोष्ट एका पैठणीची, सातारचा सलमान, बस्ता या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.  लॉकडाऊनपूर्वी सायलीचा अमिताभ बच्चन यांचा गेस्ट अपिअरन्स असलेला एबी आणि सीडी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर झळकला.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive