By  
on  

भाई सोबत भाई आरारारारा… खतरनाकच; राधेचं पोस्टर पाहिलंत का?

बॉलिवूडलाही मराठी कलाकारांची आणि कलाकृतींची भुरळ पडलीय हे आता नवीन राहिलेलं नाही. आज अनेक मराठी कलाकार हिंदीमध्ये दिमाखात झळकतात. आपल्या अभिनयाच्या जोरावर ते आपलं स्थान निर्माण करतात. बॉलिवूडचा भाईजान सलामान खानचा ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. . आता या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या नव्या पोस्टरमध्ये सलमान खानसोबत मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे देखील दिसत आहेत.

जेव्हा प्रवीण तरडे या सिनेमात झळकणार असे कळल्यापासूनच या चित्रपटाबाबत मराठी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळते. मात्र ते चित्रपटात कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप कळलेलं नाही. पण एका भाईसोबत दुसरा भाई म्हणजे जबरदस्त धम्माल अनुभवता येणार हे मात्र नक्की !

 

 

‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाची निर्मिती प्रभु देवाने केली आहे. या चित्रपटात सलमान एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणी २०१९मध्ये करण्यात आली होती. २०२०मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु करोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे तो पुढे ढकल्ण्यात आला.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive