By  
on  

'पाहिले न मी तुला'ची टीम निघाली राज्याबाहेर शूटींगला, पाहा Photos

करोनाच्या दुस-या लाटेने राज्यात थैमान घातलंय. रोज नवनवी संकंट उभी राहतायत. रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. म्हणून ही  लाट थोपविण्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत.  २२ एप्रिल ते १ मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यात चित्रपट, मालिका आणि जाहिरातींचे चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता अनेक मालिकांनी महाराष्ट्राबाहेर चित्रीकरणाचा निर्णय घेतला आहे. 

 

 

झी मराठीवरील अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली पाहिले न मी तुला ह्या मालिकेची टीमसुध्दा राज्याबाहेर चित्रिकरणासाठी रवाना झाली आहे. अभिनेता शशांक केतकरने विमानप्रवासातले फोटो नुकतेच चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

 

ही पोस्ट शेअर करत मालिकेत समर ही नकारात्मक भूमिका साकारुन प्रेक्षकांना सरप्राईज देणारा अभिनेता शशांक केतकर म्हणतो,  "हा प्रवास आम्ही करतोय तो फक्त प्रेक्षकांचा मनोरंजनचा प्रवास खंडित न होता, अजून मनोरंजक व्हावा म्हणून सर्व प्रेक्षकांचे आशीर्वाद आणि प्रेम कायम राहूदे. आम्ही आमची काळजी घेऊच ...तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या."

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive