गायकवाडांच्या सुनेला लागलेत डोहाळे, कोण देणार गुडन्युज अंजलीबाई कि नंदिता?

By  
on  

राणादा आणि अंजलीबाईंच्या केमिस्ट्रीने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं. या दोघांनीही ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवलं आहे. आता या मालिकेत एक वेगळंच वळण आलं आहे. या मालिकेतील कलाकारांनी नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/Bwj1a2XHD-v/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडियोमध्ये सर्व कलाकार कोणीतरी येणार गं या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या गाण्याच्या शेवटी नंदिता दिसत असल्याने मालिकेत आता छोट्या पाहुण्याची एंट्री होणार की काय याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. गायकवाडांच्या सुनेकडे गुडन्युज म्हटल्यावर जल्लोष व्हायलाच पाहिजे.

https://www.instagram.com/p/Bwi9GNGF_o3/?utm_source=ig_web_copy_link

गायकवाडांची धाकटी सुन नंदिता हिच्याकडे गुडन्युज असल्याचं या व्हिडियोमधून दिसून येत आहे. त्यामुळे आता या मालिकेत आणखी कोणतं नवं वळण येणार याची उत्सुकता लागली आहे.

 

Recommended

Loading...
Share