By  
on  

महेश मांजरेकर यांचा हटके ‘स्वॅग’वाला फोटो पाहिलात का? सुरु आहे कशाची तयारी?

सध्या मराठी रसिकांना उत्सुकता आहे ती मराठी बिगबॉसच्या दुस-या पर्वाची. या पर्वाच्या सुत्रसंचालनाची धुराही महेश मांजरेकर असणार हे या पुर्वीच स्पष्ट झालं आहे. शोच्या पहिल्या पर्वात महेश मांजरेकर यांच्या दमदार सूत्रसंचालनाने रसिकांची दाद मिळवली. आता या शोच्या दुस-या पर्वाचा बिगुल वाजला आहे. हा शो सुरु होणार समजल्यापासून रसिकांची उत्सुकता ताणली गेली आहे.

https://www.instagram.com/p/Bwt8ZQhACbK/?utm_source=ig_web_copy_link

महेश मांजरेकर यांचा नवा लूक नुकताच सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात ते एका लावणीला आलेल्या रसिकाप्रमाणे दिसत आहेत. एक नवा प्रोमो उद्या समोर असंही या फोटोसोबत नमुद केलं आहे. त्यामुळे या नव्या प्रोमोत काय दडलं असणार याची उत्सुकता रसिकांना आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive