By  
on  

ब्लॅक साडीत सायली संजीव दिसली खुपच सुंदर , पाहा Photos

मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून सायली संजीवने अल्पावधितच आपलं स्थान निर्माण केलं आहे. काहे दिया परदेस मालिकेमुळे तिचा खुप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. सोशल मिडीयावर सायली सतत सक्रीय असते. आपल्या आगामी प्रोजेक्टसबद्दल चाहत्यांना अपडेट ठेवण्यात सायली नेहमीच पुढे असते. 

'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सायलीने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं. मालिकांपासून सुरु झालेला सायलीचा प्रवास चित्रपटांतील गुणी अभिनेत्री इथपर्यंत पोहचला. 

 

 

सायलीने नुकतंच ब्लॅक साडीमधलं एक छानसं फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

 

सायलीच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive