'अण्णा नाईक' साकारणा-या अभिनेते माधव अभ्यकरांनी अशी खास मेहनत घेतली

By  
on  

'रात्रीस खेळ चाले' या गूढ आणि थरारक मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं तर आता नुकतंच 'रात्रीस खेळ चाले 2' हा प्रिक्वल प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतोय. मालिकेतील अण्णांची भूमिका साकारणारे अभिनेते माधव अभ्यंकर हेच या मालिकेचे खरे नायक आणि खलनायक दोन्ही आहेत. ही भूमिका लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्याच चर्चेचा विषय ठरतेय.

नुकतच एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेते माधव अभ्यंकर यांनी या भूमिकेसाठी आपण घेतलेली विशेष मेहनत याचा उलगडा केला आहे.ही भूमिका साकारणं म्हणजे खूप मोठं आव्हान होतं, असंही ते म्हणाले. अण्णांच्या भूमिकेसाठी एका महिन्यात त्यांनी सात ते आठ किलो वजन कमी केलं होतं. यादरम्यान त्यांनी कडक डाएट प्लॅन आखला होता. तसंच महत्त्वाचं म्हणजे पुण्यात अनेक वर्ष राहत असल्याने मालवणी भाषेसाठी खुप मेहनत घेतली. नाटकं, वाचन यांचा आधार घेतला आणि अशाप्रकारे पडद्यावर तुमच्यासमोर  अण्णा साकार झाले.

खरं तर अण्णा ह्या भूमिकेला प्रेक्षकांचा प्रचंड तिरस्कार आणि द्वेष मिळतोय व हेच ह्या भूमिकेचं खरं यश आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार  नाही.

Recommended

Loading...
Share