By  
on  

मराठी बिग बॉस दुस-या पर्वाची पहिली स्पर्धक ठरली ही? प्रोमो पाहून तुम्हीच ओळखा

दिवस पुढे चालले आहेत तसे मराठी बिग बॉसच्या दुस-या पर्वाची उत्सुकता वाढत चालली आहे. या पर्वाचं सुत्रसंचालन महेश मांजरेकर करणार हे स्पष्ट झालं असलं तरी या पर्वात कोण कोण स्पर्धक सहभागी होणार आहेत हे समोर आलेलं नाही.

https://twitter.com/ColorsMarathi/status/1122501326922027008

ण कलर्स मराठीच्या ट्वीटरवर नुकत्यास समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये एक लावणी नर्तिका मंचावर नृत्य करताना दिसत आहे. यावरून या पर्वाचे पहिली स्पर्धक लावणीक्षेत्राशी निगडीत असणार हे स्पष्ट झालं आहे. ‘आपल्या अदाकारीने भल्याभल्यांचे फेटे उडवलेली नार, #BiggBossMarathi2 च्या घरात कुणाकुणाची झोप उडवणार? ‘ असं कॅप्शन असलेल्या या व्हिडियोमध्ये महेश मांजरेकर यांनी प्रेक्षकांना ही स्पर्धक ओळखण्यास सांगितलं आहे. आता लावणी सम्राज्ञी म्हणजे सुरेखा पुणेकर हे एकच नाव रसिकांच्या समोर येतं. त्यामुळे या पर्वाच्या पहिल्या स्पर्धक सुरेखा पुणेकर असनार का याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive