By  
on  

प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे, ‘रंपाट’मधील ‘रॅपचिक’ साँग

सध्या संगीतक्षेत्रात रॅप साँगचा ट्रेंड आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांच्या आगामी ‘रंपाट’ या सिनेमामध्येही प्रेक्षकांना रॅप साँगचा आनंद घेता येणार आहे. या गाण्याविषयीच्या पोस्टला कॅप्शन देताना रवी जाधव म्हणतात,
‘जगात भारी आम्ही पोरं मराठमोळी, जर का ठरवलं काही करू पोरं नादखूळी!!!
रंपाटच्या दोन सुपरहिट गाण्यांनंतर पहिल्यांदाच मराठी सिनेमात घेऊन आलो आहोत एक सुसाट आणि बुंगाट मराठमोळं रॅप साँग.’

https://www.youtube.com/watch?v=sQl3j3QIfhM

रवी जाधव यांच्या रंपाट मधील या रॅप साँगवर चिनार-महेशने स्वरसाज चढवला आहे तर ए-जीत , जे-सुबोध, जॅझी नानू, अ‍ॅक्सबॉय, किलर रॉक्स यांनी रॅप गायलं आहे. संगीत चिनार-महेश यांचंच आहे. ए-जीत , जे-सुबोध, जॅझी नानू, अ‍ॅक्सबॉय आणि रवी जाधव यांनी हे गीत लिहिलं आहे. विशेष म्हणजे यात अभिनय आणि कश्मिराही खास लूक मध्ये दिसत आहेत. हा सिनेमा १७ मे २०१९ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive