शिवरायांची युद्धनिती आजही आदर्श मानली जाते. पुरेशा सैन्यबळाअभावीही गनिमांची दाणादाण उडवणारी युद्धनिती म्हणून याकडे पाहिलं जातं. याच तंत्रावर बेतलेला 'फत्तेशिकस्त' नावाचा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. 'महाराष्ट्र दिना'चा मुहुर्त साधत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'फत्तेशिकस्त' चित्रपटाची घोषणा केली.
https://www.facebook.com/DigpalOfficial/photos/a.115689329114767/321386045211760/?type=3&eid=ARAsf9vs4g4FN7FHZHh4BL0yGnAEQhaqpj3KzSr2D0O8h3apVqHlAt7YatLUH7WZ0Y93QVkmf9S8tZtr&__xts__%5B0%5D=68.ARARW3Vxw9u5w9rAkm8pffXpFAiuZc9tZZDpjxiYrj749fHzRS7IF4ZuWNdrZhCeRG2DlJyqk6G4OiteQuDbHUYeyYt8-gTLAWutOtJorZRn2X9RC4rKE_a5bah-CmtYLiA7L78t3F4CpdECOVcuvPn7jQ7VBOVR5kpmO89Wld_NntxOkuM9S0EjtKKZhG5F7X6XNrjsP8J3B94OEosthjIQ93hFLrnUMx6WXeY9tdLH2Se67Hmtg42hDk8-sIFZZhIO0HygCgWfS2c2qFmQ8LdAkYTfReHHZ9H7OGjZm7PxCXDFxrksoMwhzYBR9MY291fP2IFbazAN1ZWcalLwipo&__tn__=EEHH-R
‘फर्जंद’ या सिनेमानंतर इतिहासाचा पट पुन्हा एकदा उलगडणार आहे. ‘भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राईक’ असं या सिनेमाची टॅगलाईन आहे. या सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे अशी कलाकारांची मोठी फौज या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात शिवाजी महराजांची व्यक्तिरेखा चिन्मय मांडलेकर साकारणार आहे.