By  
on  

अभिनेता अतुल परचुरेंना बसला ऑनलाईन फ्रॉडचा फटका

सध्या ऑनलाईन खरेदीचं प्रमाण बरंच वाढलं आहे. अनेकदा सामान्य माणसाची या व्यवहारातून फसवणूक होण्याची शक्यता असते. पण सेलिब्रिटीदेखील या जाळ्यातून सुटताना दिसत नाहीत. अलीकडेच अतुल परचुरे यांची ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे. अतुल यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात दादर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. अतुल यांनी १७६४१ रुपयाची बॅग खरेदी केली. पण किंमत पुरेपूर देऊनही बॅग ताब्यात न मिळाल्याने अतुल यांना फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. एका साईटवर ४२६१५ किमतीला असलेली बॅग १७६४१ ला मिळणार असल्याचं साईट्वर सांगितलं होतं. अतुल यांनी संबंधित साईट्ला संपुर्ण पैसेदेखील दिले. पण पैसे दिल्यावर एक महिना होऊन गेला तरी बॅग ताब्यात न मिळाल्याने अतुल यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive