By  
on  

Birthday Special : ती लिंबू कलरची साडी, गुलाबी लिपस्टिक आणि डोळ्यांवरचा भला मोठा चष्मा

आपल्या सदाबहार अभिनयाने व सौंदर्याने हिंदी-मराठी सिनेसृष्टीचा 80-90 चा काळ गाजवणा-या अभिनेत्री अश्विनी भावे या आपल्या कुटुंबासह अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांच्या नेहमीच अमेरिका आणि भारत अशा वा-या सुरु असताात. जरी त्या परदेशी राहत असल्या तरी त्यांची नाळ इथल्या संस्कृतीशी अजुनही जोडलेली आहे. अजुनही ' त्या तितक्याच दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतात हे त्यांनी अलिकडेच रसिकांच्या भेटीला आलेल्या 'द रायकर केस' या वेबसिरीजमधून सिध्द केलं. 

 

 

 'अशी ही बनाबनवी' या सिनेमातील अश्विनी भावे यांचा सदाबहार अभिनय आजही प्रेक्षकांना भुरळ पाडतो. त्यांची आणि अशोक सराफ यांची केमिस्ट्री अफलातून.

या सिनेमातली त्यांची लिंबू कलरची साडी खुपच जगप्रसिध्द झाली. जसा या सिनेमाने इतिहास रचला तसाच या साडीमुळे त्यांनीही केला. 

लग्नानंतर परदेशात वास्तव्यास असल्या तरी अश्विनी भावे या नेहमीच भारतीय संस्कृती-लहेजा जपताना पाहायला मिळतात. त्यांची नाळ आजही इथल्या मातीशी जोडलेली पाहायला मिळते. 

हिंदी असो किंवा मराठी दोन्ही सिनेसृष्टींमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 

अश्विनी भावे यांना आजही मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते, प्रेक्षक उत्सुक असतात.

किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्नानंतर अश्विनी परदेशी स्थायिक झाल्या.

अमेरिकेत जरी मुलांचा जन्म झाला असला तरी अश्विनी यांनी त्यांच्यावर नेहमीच भारतीय संस्कार केले आहेत. 

 

अश्विनी या परदेशात असूनही भारतातल्या व तिथल्या राहणीमान व इतर विषयांवर नेहमीच विविध माध्यमांतून प्रभावी लिखाण करतात. 

अश्विनी यांनी चतुरस्त्र अभिनेता इरफान खानसोबत पुरुष या सिनेमात एकत्र काम केलं होतं. 

तर सिनेसृष्टी गाजवणारा त्या काळचा चॉकलेट बॉय ऋषी कपूर यांच्यासोबत हीना हा गाजलेला सिनेमा केला. 

जॅकी श्रॉॅफ आणि सलमानखानसोबत त्या बंधन या सुपरहिट सिनेमात झळकल्या होत्या.

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारसोबतही त्यांनी सैनिक या सिनेमात काम केलं होतं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive