By  
on  

‘ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो', लता दीदींकडून बीकेसी कोव्हीड हॉस्पिटलच्या डीनचं कौतुक

राज्यात करोनाचा कहर दिवसेंदिवस सुरु आहे. अद्यापही ही दुसरी भयंकर लाट ओसरण्याची चिन्ह नाहीत. करोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करतायत. तर करोना रुग्णांना वाचवण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येतोय. तहान भूक झोप विसरुन डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र झटतायत. यांच्या कामाचं मोल करावं तितकं कमी  आहे. सर्वच स्तरातून डॉक्टरांचं कौतुक होतंय, अशातच भारताची गानसरस्वती म्हणजेच भारतरत्न लता मंगेशकर यांनी पत्र लिहून डॉक्टरांचं कौतुक करत त्यांचा उत्साह वाढवला आहे. 

हे पत्र पालिकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. लता मंगेशकर यांनी बीकेसी  हॉस्पिटलचे डीन डॉ. राजेश डेरे यांना हे पत्र लिहिले आहे. “डॉ. श्री राजेश डेरे, सादर प्रणाम ! आपण महाराष्ट्रासाठी, दिवसरात्र काम करत आहात, ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो, अशी मी मंगल कामना करते. घरात सर्वांना नमस्कार! आपली नम्र लता मंगेशकर,” असे लता दीदींनी पत्रात लिहिले आहे.

 

तर पालिकेने या पत्राची प्रत पोस्टद्वारे सोशल मिडीयावर शेअर करत, " @bkccovidhospital चे अधिष्ठाता राजेश डेरे यांच्यासाठी @lata_mangeshkar जी यांनी मांडलेले हे शब्द त्यांच्या मधुर आवाजाइतकेच मधुर आहेत.या शब्दांमुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेला नवी ऊर्जा व प्रोत्साहन मिळाले आहे. धन्यवाद, लता दीदी! " असं म्हटलं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive