By  
on  

अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळीला कन्यारत्नाची प्राप्ती

अभिनेता अक्षय वाघमारे गँगस्टर अरुण गवळी यांची लेक योगिता गवळीशी मागील वर्षी लग्नाच्या बेडीत अडकला. यानंतर वर्षातच या जोडीने गोड बातमी देत कन्यारत्नाचं स्वागत केलं आहे. एका पोर्टलने दिलेल्या बातमी नुसार योगिता आणि अक्षय गोड लेकीचे आई-बाबा बनले आहेत. 

 

 

काही महिन्यांपुर्वीच अक्षयने अक्षयने त्याच्या सोशल मीडियावर योगिताच्या डोहाळे जेवणाचा एक गोड व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये योगिताने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. हा व्हिडियो चाहत्यांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अक्षय लेकीच्या जन्माची गोड बातमी चाहत्यांशी कधी शेअर करतो याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive